Mahabreaking

[breaking_news]

Man murdered  :भरपाईच्या वादातून पाडळी शिंदेत एकाची हत्या, दोन तासातच पोलिसांनी केला खूनाचा उलगडा

Man murdered  : नुकसान भरपाईवरून वाद होऊन दोघांची एकाची हत्या केल्याची घटना  देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडळी शिंदे येथे बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणाचा अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडा करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. घटनास्थळी सापडलेल्या रुमालाच्या आधारे श्वान पथकाने आरोपींचा माग काढल्याने तपासाला निर्णायक दिशा मिळाली. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

.Man murdered 

   श्वान पथकाच्या मदतीने अंढेरा पोलिसांनी दोन आरोपी केले जेरबंद; रुमाल ठरला महत्त्वाचा पुरावा

गजानन तिडके

देऊळगाव राजा  : नुकसान भरपाईवरून वाद होऊन दोघांची एकाची हत्या केल्याची घटना  देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडळी शिंदे येथे बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणाचा अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडा करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. घटनास्थळी सापडलेल्या रुमालाच्या आधारे श्वान पथकाने आरोपींचा माग काढल्याने तपासाला निर्णायक दिशा मिळाली. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Man murdered 

बुधवारी सकाळी पाडळी शिंदे येथील मच्छिंद्र उर्फ छगन तुकाराम मोरे (वय ५५) हे त्यांच्या राहत्या परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याची माहिती गावचे पोलीस पाटील भारत शिंदे यांनी अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांना दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. त्याचवेळी फॉरेन्सिक पथक, श्वान पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

रुमालामुळे लागला आरोपींचा माग

घटनास्थळाच्या पाहणीत पोलिसांना एक रुमाल सापडला. श्वान पथकाने या रुमालाचा वास घेऊन थेट संशयित आरोपींच्या दिशेने माग काढला. या धाग्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मच्छिंद्र माणिकराव सरोदे यांच्यासह आणखी एका संशयिताला अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले.

बकरीच्या भरपाईच्या वादातून खून

या प्रकरणी मृतकाची मुलगी प्रियंका राहुल खरात (रा. पीरकल्याण, जि. जालना) यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, मृतक मच्छिंद्र उर्फ छगन मोरे हे पाडळी शिंदे येथे एकटे राहत होते. काही दिवसांपूर्वी गावातील मच्छिंद्र सरोदे यांची बकरी विजेच्या तारेला करंट लागून दगावली होती. त्या बकरीच्या भरपाईची रक्कम सरोदे वारंवार मागत होते. मात्र पैसे न दिल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.

याच जुन्या वादातून ४ ऑगस्टच्या रात्री ते ५ ऑगस्टच्या पहाटेदरम्यान आरोपींनी साथीदाराच्या मदतीने मृतकाच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांचा खून केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार

मृतकाच्या पार्थिवाचे ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव मही येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाडळी शिंदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि बहीण असा परिवार आहे.

तपास सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे करीत आहेत. घटनास्थळी पोलीस अधिकारी सुरेश जारवाल, नितीन फुसे, पंढरीनाथ नेमाने, किशोर जाधव, सोनकांबळे, विलास काकड, श्वान पथक प्रमुख राजेश पद्ममने व त्यांचे पथक, फॉरेन्सिक पथक, तसेच पोलीस पाटील भारत शिंदे आणि सरपंच पती राजू ठेंग यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वेगवान तपास, फॉरेन्सिक पुरावे आणि श्वान पथकाच्या अचूक कामगिरीमुळे अंढेरा पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा केल्याने त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top