Mahabreaking

[breaking_news]

Nana Patole: ‘महायुतीचा विजय बोगस मतदानामुळेच’; नाना पटोले यांचा खळबळजनक आरोप

Nana Patole: “महायुतीचा विजय हा बोगस मतदान आणि मतांची चोरी केल्यामुळेच झाला. एसआयआरच्या माध्यमातून या प्रकारांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. मतदारांचा कलही महाविकास आघाडीकडे असताना निवडणुकीत घोळ झाल्याचा माझा आरोप आहे,” असे प्रतिपादन काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

Nana Patole

  मतांची चोरी करून विजय मिळविला; नाना पटोले यांचा महायुतीवर निशाणा

राहुल सोनोने

वाडेगाव  : “महायुतीचा विजय हा बोगस मतदान आणि मतांची चोरी केल्यामुळेच झाला. एसआयआरच्या माध्यमातून या प्रकारांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. मतदारांचा कलही महाविकास आघाडीकडे असताना निवडणुकीत घोळ झाल्याचा माझा आरोप आहे,” असे प्रतिपादन काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

वाडेगाव येथे ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी काळात राहुल गांधी यांना पंतप्रधानपदावर पाहण्याची जनतेची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले. आजही देशातील जनता भविष्यासाठी काँग्रेसकडे आशेने पाहत असल्याचेही ते म्हणाले.

दुष्काळावरून सरकारवर निशाणा

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना पटोले यांनी शासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आज दुष्काळी परिस्थितीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अल निनोच्या प्रभावाची माहिती असतानाही पावसाळ्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करून तलाव आणि धरणांमध्ये पाणीसाठा वाढविण्याचे प्रयत्न केले असते, तर आजची परिस्थिती काही प्रमाणात टाळता आली असती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे अनावरण

७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वाडेगाव येथे नवनिर्मित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारा’चे अनावरण आमदार नाना पटोले आणि आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. बसस्थानक परिसरातून सुरू झालेली ही रॅली आठवडी बाजार आणि मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गायिका सपना खरात यांनी गीतांच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजक अकोला जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रमोद डोंगरे आणि भूषण डोंगरे यांनी उपस्थित मान्यवरांचे पंचशील शाल देऊन स्वागत केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नाना पटोले, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, जम्मू शेठ, महेश गणगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी म्हैसणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रमोद डोंगरे यांनी केले, तर श्रीकांत मसने आणि सचिन धनोकर यांनी आभार मानले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top