Maharashtra Police Boys Association: “ना जातीसाठी, ना पक्षासाठी… आम्ही काम करतो फक्त खाकी व जनतेसाठी” या ब्रीदवाक्याला साजेसा प्रेरणादायी कार्यक्रम रविवारी (दि. १२ जुलै) पातूर येथे उत्साहात पार पडला. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पातूर तालुक्याच्या शाखेचे उद्घाटन, तालुका कार्यकारिणीची घोषणा तसेच नियुक्तीपत्र वितरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

‘खाकी व जनतेसाठी’ नव्या संकल्पाचा निर्धार; पातूरमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा शाखा उद्घाटन सोहळा
निशांत गवई
पातूर : “ना जातीसाठी, ना पक्षासाठी… आम्ही काम करतो फक्त खाकी व जनतेसाठी” या ब्रीदवाक्याला साजेसा प्रेरणादायी कार्यक्रम रविवारी (दि. १२ जुलै) पातूर येथे उत्साहात पार पडला. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पातूर तालुक्याच्या शाखेचे उद्घाटन, तालुका कार्यकारिणीची घोषणा तसेच नियुक्तीपत्र वितरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राहुल (भैया) दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विदर्भ अध्यक्ष आशुतोष (भैया) चव्हाण, अकोला जिल्हाध्यक्ष अक्षय वानखडे, अकोला जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) सुजित तेलगोटे तसेच विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बादलसिंग राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. पातूर पोलीस ठाण्याच्या परिसरात शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) रमेश खंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत समाजहित, युवक सक्षमीकरण आणि पोलीस-जनता समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले. यानंतर श्री सेवालाल महाराज सामाजिक सभागृहात तालुका कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेची उद्दिष्टे प्रभावीपणे राबविण्याचा तसेच समाजातील अन्यायग्रस्त, गरजू नागरिक आणि युवकांच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमास तालुका अध्यक्ष अर्जुनसिंह गहिलोत, तालुका उपाध्यक्ष अविनाश पोहरे, सचिव पवन तांबे, संघटक गौरव सदार, प्रसिद्धी प्रमुख आशिष शेगोकार, सोशल मीडिया प्रमुख प्रणव उगले, भूषण शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने युवकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून संघटनेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पातूर तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी, युवकांचे संघटन आणि पोलीस-जनता यांच्यातील विश्वास दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

