Mahabreaking

[breaking_news]

Lure of marriage :लग्नाचे आमिष, साखरपुडा आणि विश्वासघात; देऊळगाव राजात तरुणाविरुद्ध गुन्हा

Lure of marriage : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत साखरपुडा करून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर दुसऱ्याच युवतीशी विवाह केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lure of marriage

लग्नाचे आश्वासन देत संबंध, नंतर दुसऱ्याशी विवाह; महिलेची पोलिसांत धाव

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत साखरपुडा करून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर दुसऱ्याच युवतीशी विवाह केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरातील ४० वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून केतन पदमकुमार गिरणीवाले (रा. जुना जालना रोड, देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दोघांचा साखरपुडाही झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या विश्वासाच्या आधारावर आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, जून २०२२ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दोघांमध्ये संबंध होते. मात्र, लग्न करण्याचे आश्वासन देऊनही आरोपीने फिर्यादीसोबत विवाह न करता दुसऱ्या युवतीशी विवाह केल्याचे समोर आल्याने महिलेने पोलिसांत धाव घेतली.

फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी आणि तपास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक पाहणी केली.या प्रकरणामुळे परिसरात चर्चा रंगली असून, पोलिसांकडून घटनेच्या सर्व पैलूंची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top