Mahabreaking

[breaking_news]

Dispute over a joke :मजाक’वरून वाद चिघळला; गिरोली बु. येथे दोन्ही गटांमध्ये मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

Dispute over a joke : तालुक्यातील गिरोली बु. येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Dispute over

शिवीगाळ, लाकडी काठ्यांनी हल्ला अन् जीवे मारण्याच्या धमक्या; देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : तालुक्यातील गिरोली बु. येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल अशोक कुसळकर (वय २५, रा. गिरोली बु., ता. देऊळगाव राजा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून अनिल साहेबराव चव्हाण, सोनू नामदेव पवार, पूजा अनिल चव्हाण, शीतल उर्फ सविता प्रभाकर मुंदळकर, रेणुका नामदेव पवार आणि गंगाबाई साहेबराव चव्हाण (सर्व रा. गिरोली बु.) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १८९(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १८ जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी अनिल चव्हाण यांनी फिर्यादी राहुल कुसळकर यांना त्यांच्या चुलत भावाबाबत विचारणा केली. त्यावेळी “आम्ही केवळ मजाक करत होतो,” असे फिर्यादीने सांगितले. मात्र, त्यानंतर काही वेळाने आरोपींनी एकत्र येत फिर्यादीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीने शिवीगाळीबाबत जाब विचारला असता, “तू विजयला का शिवीगाळ केली?” असे म्हणत आरोपींनी वाद घालत चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच आरोपी अनिल चव्हाण आणि सोनू पवार यांनी हातातील लाकडी काठीने राहुल कुसळकर यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व पाठीवर मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता, आरोपी पूजा चव्हाण, शीतल उर्फ सविता मुंदळकर, रेणुका पवार आणि गंगाबाई चव्हाण यांनी तिलाही चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी तिच्या उजव्या हाताचे बोट मुरगळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच सर्व आरोपींनी फिर्यादी दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीसह वैद्यकीय अहवालाच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे करीत असून घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top