Mahabreaking

[breaking_news]

Illicit Liquor :जिल्ह्यात हातभट्टी दारूविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Illicit Liquor :जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू, विनापरवाना देशी-विदेशी मद्यसाठा, मोहसडवा तसेच चोरटी वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने व्यापक मोहीम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून हातभट्टी दारू, देशी-विदेशी मद्य व मोहसडवा असा एकूण ३१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Illicit Liquor

७ आरोपींवर गुन्हे; हातभट्टी, देशी-विदेशी दारूसह ₹३१,८८० चा मुद्देमाल जप्त

बुलढाणा : जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू, विनापरवाना देशी-विदेशी मद्यसाठा, मोहसडवा तसेच चोरटी वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने व्यापक मोहीम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून हातभट्टी दारू, देशी-विदेशी मद्य व मोहसडवा असा एकूण ३१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अवैध दारूधंदे समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करून वरिष्ठांच्या सूचनांनुसार जिल्हाभर कारवाई सुरू केली.

१ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापेमारी करत अवैध दारूधंद्यांवर कारवाई केली. मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा परिसरात मोहंमद जुम्मा गवळी (वय ४०) याच्याकडून ५ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. तसेच ईमाम रेहमू परसुवाले (वय ५५) याच्याकडून ८ लिटर हातभट्टी दारू आणि मोहसडवा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळगाव आटोळ येथेही मोठी कारवाई करण्यात आली. एका ४० वर्षीय महिलेकडून २० लिटर हातभट्टी दारू आणि मोहसडवा जप्त करण्यात आला. याशिवाय सुभाष रामराव मोरे (वय ५५) आणि मदन बाळाजी मोरे (वय ५२) या दोघांकडूनही हातभट्टी दारू व मोहसडवा जप्त करण्यात आला.

बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिशरण चौक परिसरात एका ५० वर्षीय महिलेकडून २५ लिटर हातभट्टी दारू आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. तर नांदूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडनेर भोलजी येथे महादेव सखाराम सुशीर (वय ४५) याच्याकडून देशी व विदेशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला.

या कारवाईत मेहकर पोलीस ठाण्यात २, अंढेरा येथे ३, बुलढाणा शहरात १ आणि नांदूरा येथे १ अशा एकूण ७ आरोपींविरुद्ध ७ स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, उपनिरीक्षक प्रताप बाजड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top