Mahabreaking

[breaking_news]

Reservation Draws :देऊळगाव राजा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Reservation Draws : तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हालचालींना वेग दिला असून जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या ११ जून रोजी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवार आणि स्थानिक राजकीय गटांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे.

Reservation Draws

११ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित होणार; इच्छुकांचे लक्ष सोडतीकडे

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हालचालींना वेग दिला असून जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या ११ जून रोजी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवार आणि स्थानिक राजकीय गटांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १० (पोटकलम २) तसेच सुधारित तरतुदींनुसार आणि सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण गट तसेच महिला आरक्षणाचा विचार करून प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही, डोड्रा, अंढेरा, शिवणी आरमाळ, बायगाव बु., मेंडगाव, पिंप्री आंधळे, टाकरखेड वायाळ, निमगाव गुरु, नागणगाव, पाडळी शिंदे, सावखेड नागरे, खल्याळ गव्हाण, मंडपगाव, मेहूणाराजा, सावखेड भोई, गिरोली खुर्द, पांगरी, जवळखेड, उंबरखेड, आळंद, पिंपळगाव बु., चिंचोली बुरकूल, पळसखेड झाल्टा, बोरखेडी बावरा आणि तुळजापूर या ग्रामपंचायतींचा या प्रक्रियेत समावेश आहे.

प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीची प्रक्रिया संबंधित ग्रामपंचायतींमध्ये अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, ११ जून २०२६ रोजी पार पडणार आहे. या प्रक्रियेदरम्यान प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार वैशाली डोंगर जाळ  यांनी केले आहे .

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने आरक्षण सोडत ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. आरक्षण निश्चितीनंतर संभाव्य उमेदवारांचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता असून, अनेक गावांमध्ये निवडणुकीच्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची उत्सुकता आता अधिक वाढली असून, ११ जूनच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top