Mahabreaking

🔴 BREAKING
Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण

LCB takes drastic action :जुगार-दारूविरोधात एलसीबीची धडक कारवाई ; १७ आरोपी जेरबंद, २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

LCB takes drastic action :जिल्ह्यात सुरू असलेल्या वरळी मटका, तासपत्ता जुगार तसेच अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १७ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले असून २५ हजार ६२५ रुपयांचा नगदी, दारू व जुगार साहित्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

LCB takes drastic action
स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वतंत्र पथकांनी १० ठिकाणी टाकली धाड

बुलढाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या वरळी मटका, तासपत्ता जुगार तसेच अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १७ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले असून २५ हजार ६२५ रुपयांचा नगदी, दारू व जुगार साहित्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंदे नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करून जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकण्याचे नियोजन केले.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १० मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कारवाई केली. तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकलारा बानोद (ता. संग्रामपूर) येथे तासपत्ता जुगार खेळणाऱ्या इसमांवर छापा टाकून सागर शंकर गिरी (वय ३२) व इतर पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ११ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेगाव शिवारात तासपत्ता जुगार खेळताना भगवानसिंग रामसिंग सोळंके व इतर दोघांना पकडून ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय विविध ठिकाणी वरळी मटका जुगार खेळणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. अंत्री खेडेकर (ता. अंढेरा) येथे प्रभाकर बळीराम मोरे, चिखलीतील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात प्रकाश तुकाराम कराडे, देऊळगाव मही येथे शेख कदीर शेख कादर, मेहकर बसस्थानक परिसरात शेख खलील शेख दगडू कुरेशी, रोहिणखेड येथे शिवाजी भि. इंगळे आणि खामगाव येथील निर्मल टर्निंग येथे आकाश श्याम वानखडे यांच्यावर छापे टाकून नगदी व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.या सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
दरम्यान, दारूबंदी कायद्यांतर्गतही दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. लोणार तालुक्यातील येवती येथे राजेंद्र रंगनाथ डोईफोडे याच्याकडून अवैध देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव बु. येथे समाधान पिराजी वाघुळ याच्याकडून अवैध दारू जप्त करून महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तामगाव, अंढेरा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, पिंपळगाव राजा, धामणगाव बढे, शिवाजीनगर, लोणार व किनगाव राजा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत एकूण १७ आरोपींवर गुन्हे नोंदवून २५,६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पुढील तपास संबंधित पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top