Mahabreaking

[breaking_news]

Honoring women :जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा गौरव; गृहिणींनाही सन्मानाची गरज

Honoring women :जागतिक महिला दिनानिमित्त देऊळगाव मही येथे छत्रपती अर्बन पतसंस्थेच्या सभागृहात कर्तबगार महिलांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महिलांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.

 

Honoring women

गजानन भालेकर 

धोत्रा नंदाई : जागतिक महिला दिनानिमित्त देऊळगाव मही येथे छत्रपती अर्बन पतसंस्थेच्या सभागृहात कर्तबगार महिलांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महिलांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ माँसाहेब व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्या सानप, हेमलता भोरजे, सविता टापरे, वैशाली बोबडे, संगीता चेके, अर्चना शिंगणे, वैशाली शिंगणे, अरुणा गवई, आश्विनी शिंगणे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सविता समाधान शिंगणे होत्या. त्या म्हणाल्या की, महिलांनी घरातील जबाबदाऱ्या सांभाळत शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. अनेक महिलांना त्यांच्या कार्यासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. मात्र घरासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या गृहिणींच्या कार्याचीही शासनाने दखल घ्यावी आणि ‘गृहिणी पुरस्कार’ सुरू करून त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अहिल्यादेवी होळकर शासन पुरस्कार प्राप्त डॉ. शिल्पा महेश दंदाले यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, एका महिलेनं जवळपास एकोणतीस वर्ष आदर्शवत राज्यकारभार करून इतिहास घडवला. त्यांच्या कार्यातून महिलांनी प्रेरणा घ्यावी.

गृहिणी वंदना नागरे यांनीही विचार व्यक्त करताना सांगितले की, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, मदर टेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला यांसारख्या अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने जगभरात आदर्श निर्माण केला आहे. आजच्या प्रगत युगात महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला सरपंच ज्योत्स्ना शिंगणे, कांता भिकाजी शिंगणे, डॉ. अलका गोडे, विद्या रमेशचंद बेगाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संगीता शिंगणे, गीता शिंगणे, लक्ष्मी म्हस्के, राजश्री शिंदे, जया खरदाकर, आशा शिंगणे, दीपाली शिंगणे, आश्विनी देशमुख, सोनल आरमाळ, ऋतुजा शिंगणे, विद्या नागरे, अनुराधा सपकाळ, कान्होपात्रा भोसले, रेणुका शहाणे यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top