Mahabreaking

[breaking_news]

Sahakar Vidya Mandir :स्व. हुकुमचंदजी कोटेचा सहकार विद्या मंदिर, देऊळगाव मही शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल

Sahakar Vidya Mandir : स्थानिक स्व. हुकुमचंदजी कोटेचा सहकार विद्या मंदिर, देऊळगाव मही या शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीदेखील कायम राहिली आहे. यंदा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

Sahakar Vidya Mandir

गजानन भालेकर

देऊळगाव मही : स्थानिक स्व. हुकुमचंदजी कोटेचा सहकार विद्या मंदिर, देऊळगाव मही या शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीदेखील कायम राहिली आहे. यंदा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

यावर्षी शाळेतील एकूण १०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण ५२ विद्यार्थ्यांनी मिळवले. तसेच ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या ७ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.

या परीक्षेत शुभांगी आनंद सरोदे हिने ९७.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कोमल संतोष अंभोरे हिने ९७.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर ऋतुिका गजानन बेल्ट हिने ९७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.या उत्कृष्ट निकालाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक (भाईजी), बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुकेशजी झंवर तसेच बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल मॅडम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश इंगळे, पर्यवेक्षक खेडेकर , रोहित पराड, पडघान, केशव तळेकर, पालवे, राहुल, दुगड मॅडम यांच्यासह सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top