Excellent Results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती विभागाचा नुकताच दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, कै. विजय मखमले माध्यमिक व उर्दू माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ट यश संपादन केले आहे. उर्दू माध्यमिक विद्यालयाचा ९६ टक्के, तर मराठी माध्यमिक विद्यालयाचा ८९.४० टक्के निकाल लागला आहे.

फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती विभागाचा नुकताच दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, कै. विजय मखमले माध्यमिक व उर्दू माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ट यश संपादन केले आहे. उर्दू माध्यमिक विद्यालयाचा ९६ टक्के, तर मराठी माध्यमिक विद्यालयाचा ८९.४० टक्के निकाल लागला आहे.
उर्दू माध्यमिक विद्यालयातून जवेरिया जलील शेख हिने ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. नबीला बी. रहेमान खान पठाण हिने ८९.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर उजमा बी. अकील खान पठाण हिने ८८.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.मराठी माध्यमिक विद्यालयातून सृष्टी परमेश्वर देशमुख हिने ८९.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. पुनम राजू खिल्लारे आणि साक्षी अनंता सांगळे यांनी ८९ टक्के गुणांसह संयुक्त द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच वेदिका दिगांबर चव्हाण आणि प्रियंका एकनाथ उगले यांनी ८८.८० टक्के गुण मिळवून संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त केला.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण मखमले आणि सचिव गिरीश मखमले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

