Mahabreaking

[breaking_news]

Ujjwal Public School :उज्ज्वल पब्लिक स्कूलची यशाची परंपरा कायम; दहावीचा निकाल सलग शंभर टक्के

Ujjwal Public School : शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या येथील उज्ज्वल पब्लिक स्कूलने यंदाही इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून, सलग सातत्याने शंभर टक्के निकाल देणारी परिसरातील ही एकमेव नामांकित शाळा ठरली आहे.

Ujjwal Public School

संजय तायडे 

बोरगाव मंजू : शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या येथील उज्ज्वल पब्लिक स्कूलने यंदाही इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून, सलग सातत्याने शंभर टक्के निकाल देणारी परिसरातील ही एकमेव नामांकित शाळा ठरली आहे.

यंदाच्या परीक्षेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये रुद्र दत्तात्रय नेमाडे (88.20 टक्के), प्राची नरेंद्र भवाने (85.40 टक्के), जयंत इंगोले (82.60 टक्के), श्रुती संतोष भटकर (83.60 टक्के) आणि निशांत तायडे (81.20 टक्के) यांनी विशेष प्राविण्य मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना मुख्याध्यापिका उज्वला नरेंद्र सोनावणे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांनी दाखवलेला विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.”

या यशाबद्दल मुख्याध्यापिका उज्वला नरेंद्र सोनावणे, प्रशासकीय अधिकारी निता राजेंद्र बोबडे तसेच शिक्षक प्रशांत होणाले, स्वाती जैन, मीना वानखेडे, मोहिनी इंगळे, रूपाली कडू, शारदा देशमुख, दिपाली देशमुख, कुमुद काटोले, स्मिता पाटील, जया हगवणे, दुर्गा असलमोल, प्रीती वाघमारे, अश्विनी माहुलकर, रूपाली इंगळे, पूजा भराते आणि प्रतीक वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, आगामी काळातही गुणवत्तेचा हा आलेख असाच उंचावत राहील, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top