Mahabreaking

[breaking_news]

Kneading maida :मैदा पायाने तुडवून खाद्यपदार्थ बनवण्याचा व्हिडीओ व्हायरल; स्वीट मार्टवर कारवाई

Kneading maida : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडिओमुळे जानेफळ येथील खाद्यपदार्थ व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पोपहार तयार करण्यासाठी मैदा पायाने तुडविला जात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित आस्थापनेची तपासणी करून पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे.

Kneading maida

अन्न सुरक्षा विभागाची पोलिसांत तक्रार ; जानेफळातील जय अंबे स्वीट मार्ट बंद करण्याची नोटीस

जानेफळ : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडिओमुळे जानेफळ येथील खाद्यपदार्थ व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पोपहार तयार करण्यासाठी मैदा पायाने तुडविला जात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित आस्थापनेची तपासणी करून पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेफळ येथील मे. श्री जय अंबे स्वीट मार्ट या आस्थापनेशी संबंधित कथित व्हिडिओ १८ जून रोजी सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. तसेच स्थानिक वर्तमानपत्रांमध्येदेखील या संदर्भातील वृत्त प्रकाशित झाले होते.

या घटनेची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा विभागाने संबंधित आस्थापनेची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच अन्न व्यवसायिक परवाना व नोंदणी नियमांतील काही तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित व्यावसायिकाला व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.

आस्थापनेचे मालक भवाराराम हिराराम प्रजापत यांना विचारणा केली असता, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मादाराम गोकलराम प्रजापत असून तो त्यांच्या घरी मैदा तुडवत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सदर व्यक्ती सध्या दुकानात काम करत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.त्यानंतर अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यावसायिकाच्या निवासस्थानी भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी तेथे कोणताही अन्नसाठा किंवा खाद्यपदार्थ निर्मितीचे काम सुरू नसल्याचे आढळून आले.

तथापि, या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असल्याने अन्न सुरक्षा विभागाने सविस्तर चौकशी करून संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम ५९ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम २७४, २७५ आणि इतर लागू तरतुदींनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून कथित व्हिडिओची सत्यता, त्यामागील परिस्थिती आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top