Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

municipal elections.: नगर पालिकांच्या स्थगित निवडणुकीसाठी पुन्हा राजकारण तापणार

municipal elections.: जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांची धामधूम २ डिसेंबर रोजी मतदानानंतर शांत झाली होती. उमेदवारांनीही थोडा दिलासा घेतला होता. मात्र देऊळगाव राजा नगरपरिषद तसेच खामगाव, शेगाव आणि जळगाव जामोद येथील नऊ सदस्यांच्या निवडणुका स्थगित झाल्याने सर्वच उमेदवारांची पुन्हा धडधड वाढली आहे. या प्रभागांसाठी नव्याने २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, तोपर्यंत उमेदवारांना पुन्हा प्रचार सुरू ठेवावा लागणार आहे. पुढील 8 दिवस मतदारांना सांभाळणे आणि संपर्क टिकवून ठेवणे ही उमेदवारांसाठी मोठी कसोटी ठरणार आहे.

election

8 दिवसांची ‘कसोटी’! मतदान २० डिसेंबरला; प्रचार पुन्हा पेटणार

बुलढाणा : जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांची धामधूम २ डिसेंबर रोजी मतदानानंतर शांत झाली होती. उमेदवारांनीही थोडा दिलासा घेतला होता. मात्र देऊळगाव राजा नगरपरिषद तसेच खामगाव, शेगाव आणि जळगाव जामोद येथील नऊ सदस्यांच्या निवडणुका स्थगित झाल्याने सर्वच उमेदवारांची पुन्हा धडधड वाढली आहे.
या प्रभागांसाठी नव्याने २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, तोपर्यंत उमेदवारांना पुन्हा प्रचार सुरू ठेवावा लागणार आहे. पुढील 8 दिवस मतदारांना सांभाळणे आणि संपर्क टिकवून ठेवणे ही उमेदवारांसाठी मोठी कसोटी ठरणार आहे.
निवडणूक आयोगाने या स्थगित निवडणुकांसाठी छाननी व पुढील प्रक्रिया नव्याने जाहीर केली असली तरी उमेदवार बदलणार नाहीत. आधी अर्ज दाखल केलेलेच उमेदवार रिंगणात राहतील किंवा इच्छुकांना अर्ज मागे घेता येईल. त्यामुळे नव्या उमेदवारांना यात संधी मिळणार नाही.
आधीच निवडणूक प्रचारामुळे उमेदवारांचा खर्च वाढलेला. त्यात आता २० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या वाढीव प्रचाराचा भार त्यांच्या माथी पडणार आहे.खर्चाची मर्यादा मात्र तीच असल्याने, अनेक उमेदवारांपुढे नवा आर्थिक पेच उभा राहिला आहे.

बॅनर–पोस्टर, ऑडिओ क्लिप्सही बदलाव्या लागणार

शहरात लावलेले प्रचार बॅनर, पोस्टर, प्रसिद्धपत्रके यांवरील दिनांक बदलल्याने उमेदवारांना सर्व छापील साहित्य पुन्हा छापण्याची वेळ आली आहे.तयार केलेल्या ऑडिओ–व्हिडिओ क्लिप्सचेही संपादन किंवा पुनर्निर्मिती करावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांचा ताण वाढला आहे.

२० डिसेंबरपर्यंत ‘मतदार सांभाळा’ मोहीम!

स्थगित प्रभागांतील उमेदवारांना आता २० तारखेपर्यंत प्रभागातील मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवावा लागणार आहे. मतदान पुढे ढकलल्याने थंडावलेला प्रचार पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top