Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

Deulgaon Raja municipality :देऊळगाव राजा पालिकेत ८० उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद,71.67 टक्के मतदान

Deulgaon Raja municipality :न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलण्यात आलेली देऊळगाव राजा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अखेर आज (दि. २०) शांततेत पार पडली. नगराध्यक्षपदासह दहा प्रभागांतील २१ जागांसाठी तब्बल ८० उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या रविवारी जाहीर होणार असून, शेवटपर्यंत चुरस कायम राहिल्याचे चित्र आहे.दरम्यान पालिकेसाठी 71. 67 टक्के मतदान झाले.

Deulgaon Raja municipality

रविवारी निकाल; तिरंगी लढतीत शेवटपर्यंत चुरस, बोगस मतदार ताब्यात

गजानन तिडके

देऊळगाव राजा : न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलण्यात आलेली देऊळगाव राजा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अखेर आज (दि. २०) शांततेत पार पडली. नगराध्यक्षपदासह दहा प्रभागांतील २१ जागांसाठी तब्बल ८० उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या रविवारी जाहीर होणार असून, शेवटपर्यंत चुरस कायम राहिल्याचे चित्र आहे.दरम्यान पालिकेसाठी 71. 67 टक्के मतदान झाले. एकूण 21 हजार 17 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 10 हजार 906 पूरूष तर 10 हजार 111 महिला मतदारांचा समावेश होता.

न्यायालयीन विलंबाचा प्रचारावर परिणाम

पालिकेच्या इतिहासात प्रथमच ही निवडणूक दिग्गजांनी प्रतिष्ठेची केल्याचे दिसून आले. न्यायालयीन प्रक्रियेमुळे उमेदवारांना प्रचारासाठी ८ ते १० दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळाला. मात्र, हा कालावधी अनेक उमेदवारांसाठी खर्चिक व तणावपूर्ण ठरल्याची चर्चा दिवसभर मतदारसंघात होती. काहींना याचा फायदा झाला, तर काहींची राजकीय गणिते बिघडल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून अप्रत्यक्षपणे सांगितले जात होते.

अर्थकारणावर टीका; लोकशाहीसाठी धोक्याची घंटा

प्रचार काळात आणि मतदानाच्या दिवशीही अर्थकारणाला मोठा वाव मिळाल्याची चर्चा जुने जाणकार मतदार व राजकीय निरीक्षक करताना दिसले. “अर्थकारण आणि निवडणूक” ही समीकरणे लोकशाहीसाठी घातक असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

मतदानाचा संथ प्रारंभ, दुपारनंतर वेग

सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळच्या कडाक्याच्या थंडीमुळे व सुरुवातीच्या संथ हालचालींमुळे मतदानाचा वेग कमी होता. दुपारी १.३० वाजेपर्यंत : २१.९८% दुपारी ३.३० वाजेपर्यंत : ३६.२३%
दुपारनंतर मात्र मतदान केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली.

तिरंगी लढत; तीन आघाड्यांमध्ये थेट संघर्ष

यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – भाजपा – मित्र पक्ष

नगराध्यक्षपदासाठी : माधुरीताई शिपने , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – शिवसेना (शिंदे गट) – मित्र पक्ष, नगराध्यक्षपदासाठी : नेहाताई सुनगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – काँग्रेस व मित्र पक्ष नगराध्यक्षपदासाठी : शोभाताई कासारे रिंगणात आहेत. दहा प्रभागांतील २१ जागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात असून, नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर कडवी चुरस पाहायला मिळाली.

मतदारसंख्या व प्रशासकीय यंत्रणा

पालिकेतील एकूण मतदारसंख्या २९,३२६ असून, त्यात

पुरुष : १४,८५४

महिला : १४,४०६

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी

क्षेत्रीय अधिकारी : ४

मतदान केंद्र अध्यक्ष : ३४ (४ राखीव)

मतदान अधिकारी : १०२

महिला ओळख पडताळणीसाठी : ३० महिला कर्मचारी

पोलीस बंदोबस्त : १२ पोलीस अधिकारी व सुमारे २०० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

संपूर्ण प्रक्रियेवर पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश थोरात, सहाय्यक निवडणूक अधिकारी वैशाली डोंगरजाळ व सुप्रिया चव्हाण यांनी लक्ष ठेवले.

ईव्हीएम बिघाड व बोगस मतदान

आदर्श कॉलनी, छत्रपती शिवाजी व पिंपळनेर येथील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अल्पकाळ मतदान थांबले. तांत्रिक पथकाने तत्काळ दुरुस्ती करून प्रक्रिया पुन्हा सुरू केली.
दरम्यान, बोगस मतदान करताना एक आरोपी ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top