Mahabreaking

[breaking_news]

House Catches Fire :बाळापुरात घराला आग, साहित्य जळून खाक, गोरे कुटुुंबाचा संसार उघड्यावर 

House Catches Fire : त्यंत गरिबीतून आणि कष्टाने उभे केलेले हक्काचे घर पूर्णपणे जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी रात्री बाळापूर शहरातील गुजराथीपुरा भागात घडली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाल्याने संतोष प्रल्हाद गोरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

House Catches Fire

बाळापूर : अत्यंत गरिबीतून आणि कष्टाने उभे केलेले हक्काचे घर पूर्णपणे जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी रात्री बाळापूर शहरातील गुजराथीपुरा भागात घडली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाल्याने संतोष प्रल्हाद गोरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

काही महिन्यांपूर्वीच गोरे यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजने’ अंतर्गत मोठ्या आशेने आपले घरकुल पूर्ण केले होते. मात्र, काळाच्या मनात काही वेगळेच होते; ज्या घरात सुखाने राहण्याचे स्वप्न पाहिले होते, तेच घरकुल डोळ्यादेखत जळून राख होताना पाहण्याची वेळ गोरे कुटुंबावर आली.

या भीषण आगीत रोख ४० हजार रुपयांसह घरातील अन्नधान्य, फर्निचर, कपडे, साड्या आणि संपूर्ण इलेक्ट्रिक फिटिंग जळून खाक झाले असून यां आगीत त्यांचे अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागताच परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत तातडीने धाव घेतली आणि घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढले, ज्यामुळे भीषण स्फोट टळला आणि मोठी जीवितहानी वाचली. मात्र या घटनेत संतोष गोरे यांचा मुलगा किरकोळ भाजला आहे.

संतोष गोरे हे पानटपरी चालवून तर त्यांची पत्नी सौ. सपना गोरे या शिलाई काम करून कुटुंबाचा गाडा ओढत होत्या. मात्र, या आगीत त्यांच्या उपजीविकेचे साधन असलेली शिलाई मशीन आणि ग्राहकांच्या साड्याही जळून गेल्याने आज त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. हक्काचे घरकुलातील संसार आणि रोजगाराचे साधन एकाच वेळी हिरावले गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी भानुदास मस्के,  यांनी करून अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवला आहे. तसेच बाळापूर पोलिस स्टेशनंला सुद्धा तक्रार दिली असून पोलिसांनी सुद्धा यां घटनेचा पंचनामा केला असून पुढील अधिक तपास सुरु आहे. प्रशासनाने त्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top