Mahabreaking

[breaking_news]

Municipal Council Elections :नगरपरिषद निवडणूक : वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानधनाचे आदेश; वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष?

Municipal Council Elections : नगर परिषद /नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत अतिरीक्त काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते. निवडणुकीच्या कामात असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानधन देण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या कर्मचाऱ्यांचेही मानधन तातडीने देण्याची मागणी होत आहे.

Municipal Council Elections

जाकीर अहमद

बाळापूर :  नगर परिषद /नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत अतिरीक्त काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते. निवडणुकीच्या कामात असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानधन देण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या कर्मचाऱ्यांचेही मानधन तातडीने देण्याची मागणी होत आहे.

निवडणुकीच्या कामात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिकालिक भत्ता (मानधन) अदा करण्याबाबत शासनाने आदेश जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अतिरिक्त वेळेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानधन देण्याबाबत संबधित नगर पालिकांना पत्र पाठवून आदेश देण्यात आले. बाळापूर पालिकेतही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मानधन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, दुसरीकडे निवडणूक काळात प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीदरम्यान अनेक कर्मचाऱ्यांनी सलग २० ते २२ दिवस अतिरिक्त वेळेत काम करूनही त्यांना अद्याप कोणतेही मानधन मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे.

निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्रांची तयारी, साहित्य वितरण, मतमोजणीची तयारी आदी विविध जबाबदाऱ्या पार पाडताना कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली. तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मानधनाचे आदेश निघत असताना खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बाब लक्षात घेऊन शासन व जिल्हा प्रशासनाने वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांनाही न्याय देत त्यांच्या मानधनाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top