Mahabreaking

[breaking_news]

Health Department :जलकुंभात मृत वानर ; खिरपुरी येथे आरोग्य विभागाची घरोघरी पाहणी; पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले!

Health Department :तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी गावात घरोघरी भेट देत नागरिकांची माहिती घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागाच्या पथकाने गावातील विविध भागांना भेट देत नागरिकांची विचारपूस केली.

Health Department

बाळापूर : तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी गावात घरोघरी भेट देत नागरिकांची माहिती घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागाच्या पथकाने गावातील विविध भागांना भेट देत नागरिकांची विचारपूस केली.
पाणीपुरवठ्यामुळे कोणाला त्रास जाणवत आहे का, याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच, जलकुंभातून वितरित झालेल्या पाण्याचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी बाळापूर पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी शरद ठाकूर, खिरपुरी आरोग्य केंद्राचे सीएचओ डॉ. प्रवीण निंबाळकर, आरोग्य सेवक पवन देवकते व ग्रामस्थ उपस्थित होते.
पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्व परिसरात अस्वच्छता!

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाशी संबंधित व्हॉल्व परिसरात घाण साचली आहे. या अस्वच्छतेमुळे दूषित पाणी जलकुंभात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, गावाला होणारा पाणीपुरवठा दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

ब्लिचिंग पावडर उपलब्ध; मात्र वापरावर प्रश्नचिन्ह

दूषित पाणीपुरवठ्याची शक्यता असतानाही जलकुंभाची नियमित स्वच्छता केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच, ब्लिचिंग पावडर उपलब्ध असूनही तिचा योग्य वापर केला जात नसल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत असल्याचा दावा केला असला, तरी ग्रामस्थांनी हा दावा फेटाळून लावला आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top