Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Horrific Accident on Tamsi Route :तामसी मार्गावर थरारक अपघात; चाक निखळल्याने चारचाकी पुलावरून खाली कोसळली

Horrific Accident on Tamsi Route : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव–तामसी मार्गावर चारचाकी वाहनाचे चाक अचानक निखळल्याने गाडी पुलावरून खाली कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१४ मार्च) दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून चालक जखमी झाला आहे.

Horrific Accident on Tamsi Route
लग्नसमारंभावरून परतताना घटना; ग्रामस्थांच्या तत्परतेने चालकाला मदत

राहुल सोनोने 

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव–तामसी मार्गावर चारचाकी वाहनाचे चाक अचानक निखळल्याने गाडी पुलावरून खाली कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१४ मार्च) दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून चालक जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामसी येथे एका लग्नसमारंभाला उपस्थित राहिल्यानंतर चारचाकी वाहन वाडेगावकडे परत येत होते. दरम्यान मार्गात अचानक वाहनाचे चाक निखळले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि चारचाकी थेट पुलावरून खाली कोसळली. या घटनेमुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली.

या अपघातात बळीराम महानकार (रा. लांजोड, ता. खामगाव) हे वाहन चालक जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच तामसी येथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तामसीचे सरपंच आनंद पातोडे, विठ्ठल जाधव, देवलाल पातोडे, अमर गवई, अनिल बाहे, तुषार काळे, राजरत्न पातोडे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठी मदत करत जखमी चालकाला वाहनातून बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी रवाना केले.

दरम्यान, या अपघातामुळे वाडेगाव–तामसी मार्गावर काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. सुदैवाने वाहनातील इतर कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top