Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Dramatic Assault Outside Bar :देऊळगावमहीत बारसमोर मारहाणीचा थरार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Dramatic Assault Outside Bar :तालुक्यातील देऊळगावमही येथे मध्यरात्री बारसमोर झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांसह लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dramatic Assault Outside Bar
लाथाबुक्क्यांसह काठीने बेदम मारहाण; मध्यरात्रीची घटना, पोलिसांचा तपास सुरू

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगावमही येथे मध्यरात्री बारसमोर झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांसह लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कैलास प्रल्हाद देढे (वय ३४, रा. देऊळगावमही ता. देऊळगाव राजा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गोविंद देढे, कार्तिक लिंबाजी देढे आणि संदीप देढे (रा. सर्व देऊळगावमही) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी पहाटे सुमारे १ वाजताच्या सुमारास देऊळगावमही येथील ‘निवांत बार’ परिसरात ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादी कैलास देढे यांना अडवून जमिनीवर खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांसह लाकडी काठीने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. फिर्यादीच्या तोंडी अहवालावरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी कायमी अप क्रमांक १०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्हा १३ मार्च रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी नोंदविण्यात आला. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद गवई यांनी पार पाडली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय, तसेच आरोपींमध्ये आणि फिर्यादीत नेमका वाद कशावरून झाला याचा तपास पोलीस करीत आहेत. गावात घडलेल्या या घटनेमुळे देऊळगावमही परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top