Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Midnight Blaze Wreaks Havoc :अकोल्यात मध्यरात्री आगीचा कहर! सिटी कोतवालीजवळ ७ कापड दुकाने जळून खाक

Midnight Blaze Wreaks Havoc :शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या सिटी कोतवाली परिसरात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीने ६ ते ७ कापड दुकाने अक्षरशः भस्मसात झाली. या आगीत दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे.

Midnight Blaze Wreaks Havoc
‘बिंदी घर’ परिसरातील बाजारपेठ भस्मसात; लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाने मोठी दुर्घटना टाळली

अकोला : शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या सिटी कोतवाली परिसरात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीने ६ ते ७ कापड दुकाने अक्षरशः भस्मसात झाली. या आगीत दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे.

१४ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळते. महापालिकेच्या जागेवर असलेल्या कपड्यांच्या दुकानांमध्ये अचानक आग भडकली आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण करत ज्वाळांचे लोळ आकाशात उसळू लागले. दूरवरून दिसणाऱ्या धुराच्या ढगांमुळे आणि आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

Midnight Blaze Wreaks Havoc

विशेष म्हणजे वादग्रस्त ‘बिंदी घर’ परिसरातील कापड दुकानेही या आगीच्या तडाख्यात पूर्णपणे जळून खाक झाली. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपड्यांचा साठा असल्यामुळे आग झपाट्याने पसरली आणि काही वेळातच संपूर्ण रांग जळून गेली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दीर्घकाळाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले, अन्यथा ही आग आसपासच्या इमारती आणि दुकानांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात होती.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सिटी कोतवाली परिसरात काही काळ भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top