Mahabreaking

[breaking_news]

Sahakar Vidya Mandir :सहकार विद्या मंदिर, देऊळगाव मही येथे संत गाडगे महाराजांना अभिवादन 

Sahakar Vidya Mandir : स्थानिक सहकार विद्या मंदिर येथे दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खेडेकर, चेके तसेच विमल शिंगणे मॅडम उपस्थित होत्या.

Sahakar Vidya Mandir

देऊळगाव मही : स्थानिक सहकार विद्या मंदिर येथे दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खेडेकर, चेके तसेच विमल शिंगणे मॅडम उपस्थित होत्या.

भरधाव बसने दुचाकीस उडवले, पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी

कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे संत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेत सादर झालेला विद्यार्थी होय. विद्यार्थ्यांनी संतांच्या विचारांवर आधारित स्वच्छतेचे महत्त्व आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन गावात स्वच्छता मोहीम राबवली.

स्वच्छता अभियानाची सुरुवात आठवडी बाजार परिसरातून करण्यात आली. त्यानंतर बौद्ध विहार, दिग्रस चौक, ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव मही तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व परिसराची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे गावात सकारात्मक संदेश पोहोचला.

विद्यार्थ्यांचे हे उत्कृष्ट कार्य पाहून ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. प्रभात फेरीत मुख्याध्यापक प्रकाश इंगळे, पर्यवेक्षक खेडेकर, केशव तळेकर, रोहित शिवशंकर शिंगणे, डोईफोडे सर, गणेश चव्हाण, प्रवीण खिल्लारे, मोरे मॅडम, दंडाले मॅडम, पत्रकार अमोल बोबडे तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दंडाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवशंकर शिंगणे यांनी केले. या सामाजिक उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सहकार विद्या मंदिरच्या या उपक्रमाची संपूर्ण परिसरात चर्चा रंगली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top