Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

A speeding bus :भरधाव बसने दुचाकीस उडवले, पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी

A speeding bus : रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला भरधाव बसने धडक दिल्याने पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना चिखली ते जालना मार्गावरील बेराळा फाट्याजवळ  २३ फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजता घडली. संजय पांडुरंग गायकवाड (वय ५८) रा. केळवद असे मृतकाचे नाव आहे.

A speeding bus

चिखली-जालना मार्गावर बेराळा फाट्यावरील घटना; देवदर्शनाला निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला

चिखली : रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला भरधाव बसने धडक दिल्याने पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना चिखली ते जालना मार्गावरील बेराळा फाट्याजवळ  २३ फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजता घडली. संजय पांडुरंग गायकवाड (वय ५८) रा. केळवद असे मृतकाचे नाव आहे.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा या पेजला भेट द्या 

चिखली तालुक्यातील केळवद येथील संजय पांडुरंग गायकवाड (वय ५८) व पत्नी  शीला गायकवाड (वय ५०) हे दाम्पत्य २३ फेब्रुवारीच्या सकाळी जांभोरा येथे दर्शनासाठी जात होते. चिखली ते जालना मार्गावर बेराळा फाट्यावर रस्ता ओलांडताना जालन्याकडून भरधाव वेगात आलेल्या एमएच-१४-एमएच-०८७२ क्रमांकाच्या संभाजीनगर ते हिंगणघाट या बसने दुचाकीला जबरदस्त धडक दिली. या धडकेत पती संजय गायकवाड जागीच ठार झाले, तर पत्नी शीला गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच जखमी महिलेस तातडीने उपचारासाठी हलविले. तसेच मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.या प्रकरणी पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top