Mahabreaking

[breaking_news]

  Grand Rally for Cow Protection :देऊळगाव राजात गो-सन्मानाची भव्य रॅली; हजारोंच्या स्वाक्षरीचे दिले निवेदन

Grand Rally for Cow Protection : देशभरात राबवण्यात येत असलेल्या  ‘गो-सन्मान आवाहन अभियान’ अंतर्गत देऊळगाव राजा शहरात भव्य रॅलीचे आयोजन आज (दि. २७ एप्रिल) करण्यात आले.  या अभियानाची रूपरेषा वृंदावन येथे विविध संत-महाराज, गोप्रेमी व धर्मप्रेमी मंडळींनी निश्चित केली आहे.

Grand Rally for Cow Protection

 गोसंवर्धनासाठी जनसागर रस्त्यावर;  विविध मागण्यांसाठी काढण्यात आली रॅली

गजानन तिडके

देऊळगाव राजा : देशभरात राबवण्यात येत असलेल्या  ‘गो-सन्मान आवाहन अभियान’ अंतर्गत देऊळगाव राजा शहरात भव्य रॅलीचे आयोजन आज (दि. २७ एप्रिल) करण्यात आले.  या अभियानाची रूपरेषा वृंदावन येथे विविध संत-महाराज, गोप्रेमी व धर्मप्रेमी मंडळींनी निश्चित केली आहे.

Grand Rally for Cow Protection

या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांना हजारो नागरिकांच्या सह्यांसह निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात काही महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, संपूर्ण भारतात ‘गो-सन्मान दिन’ साजरा करण्यात यावा, भारतीय संसदेत कायदा करून देशभर गोहत्या व गोतस्करीवर एकसमान बंदी लागू करावी, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच गोसेवक व गोशाळांना संरक्षण मिळावे, गो-उत्पादनांना शासकीय स्तरावर बाजारपेठेचे संरक्षण मिळावे, देशी गोमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा द्यावा आणि भारतीय शिक्षण पद्धतीत गोवंश संवर्धन, पालनपोषण व कृषीआधारित उपक्रमांचा समावेश करावा, अशा मागण्यांचाही समावेश आहे. भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी या सर्व बाबींवर देशभर एकवाक्यता राहावी व कोणत्याही राज्याने याबाबत दुर्लक्ष करू नये, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या अभियानाचा पहिला टप्पा म्हणून ही रॅली काढण्यात आली असून, तहसील प्रशासनामार्फत हे निवेदन मा. मुख्यमंत्री, मा. पंतप्रधान व मा. राष्ट्रपती यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. पुढील वर्षभर हे अभियान तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. रॅलीदरम्यान शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने काही काळ बंद ठेवण्यात आली होती. व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार, महिला, युवक, विद्यार्थी, विविध धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी, गोशाळा व मंदिर समितीचे पदाधिकारी, वारकरी, दिंडीकरी, संत-महाराज, पत्रकार, तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पोलीस स्टेशन, तहसील प्रशासन व नगरपालिका यांचे सहकार्य लाभले. अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत गोमाता व नंदी पूजन केले, तसेच पाणी व फळांचे वाटपही करण्यात आले. शेवटी काही मान्यवरांनी माध्यमांसमोर अभियानाची पुढील दिशा स्पष्ट केली व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top