Mahabreaking

[breaking_news]

Manoj Kayande :पाणीटंचाईचे समूळ उच्चांटन करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा – मनोज कायंदे

Manoj Kayande : संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच वारंवार होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी त्या पद्धतीचे प्रस्ताव सादर करा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले दि. 27 एप्रिल रोजी देऊळगाव राजा येथे पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यात पाणीटंचाई निवारणासाठीच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार मनोज कायंदे यांनी दिला.

Manoj Kayande
देऊळगावराजा येथे पाणीटंचाईनिमित्त आढावा बैठक : कामे पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच वारंवार होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी त्या पद्धतीचे प्रस्ताव सादर करा असे आदेश आमदार मनोज कायंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दि. 27 एप्रिल रोजी देऊळगाव राजा येथे पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यात पाणीटंचाई निवारणासाठीच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार मनोज कायंदे यांनी दिला.
समाधानकारक तालुक्यात पर्जन्यवृष्टी झाली असली तरी तालुक्यातील महसूल मंडळात काही गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मनोज कार्यदे यांनी तालुक्यातील ६० गावे आणि मतदारसंघातील चिखली तालुक्यातील २२ गावांचा सविस्तर आढावा घेतला. बहुतांश गावांमध्ये जलजीवन मिशन आणि इतर पाणीपुरवठा योजनांची कामे अधिकाऱ्यांच्या तसेच कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे अपूर्ण राहिली आहेत. यामुळे या योजनांचा योग्य लाभनागरिकांना मिळत नाही. याच मुद्दयावर आमदार कायंदे यांनी गावनिहाय पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. आणि वारंवार पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ कायमस्वरूपी जल स्त्रोत पाहून अशा प्रकारे कृती आराखडा सादर करा असे स्पष्ट आदेश आजच्या पाणीटंचाई आढावा बैठकीत विभागाचे आमदार मनोज कायंदे यांनी दिले

तालुकातील 60 गावांचा घेतला आढावा.

देऊळगाव राजा तालुक्यातील ६० गावातील पाणीटंचाइचा आढावा आमदार कायंदे यांनी घेतला. तसेच मतदार संघात समाविष्ट असलेल्या चिखली तालुक्यातील २२ गावांची स्थितीही त्यांनी जाणून घेतली. विशेष म्हणजे प्रत्येक गाव निहाय माहिती त्यांनी घेतली. तसेच उपाय योजना करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस नायब तहसीलदार सायली जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी सुधाकर वायाळ,, उप अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) चे कनिष्ठ अभियंता जानकी जाधव, श्रद्धा बनकर,आकाश कचरे, उपविभागीय अभियंता एस किरण पाटील, व्ही एल दळवी शाखा अभियंता जि पबांधकाम, शिक्षण विस्तार अधिकारी दादाराव मुसदवाले, तालुका कृषी अधिकारी भगवान कच्छवे, पाणीटंचाई कक्ष प्रमुख व्ही. बि. सावळे , दिलीप सानप, भानुदास कोल्हे, गणेश डोईफोडे, दिलीप झोटे, गजानन काकड, शुभम कायंदे, अक्षय ठाकरे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक ग्राम पातळीवर काम कर्मचारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

फक्त कागदपत्रांवर उपाययोजना नको!’
आमदार कायंदे यांनी फक्त अहवाल सादर करून पाणीटंचाई निवारण करता येणार नाही. शासनाने प्रत्येक गावासाठी मंजूर केलेल्या पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालू आहेत का, याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. मात्र, अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे केवळ कागदपत्रांवर उपाययोजना नको, असा इशारा दिला.

जलजीवन मिशन योजनेतील दिरंगाई!
जलजीवन मिशन अंतर्गत आठ गावांसाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना मंजूर झाल्या असूनही त्या अद्याप अपूर्ण आहेत. या योजनांच्या मुदती संपल्या असतानाही अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम न घेतल्याने ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार कायंदे यांनी दिले. मतदारसंघात कोठे पाणीटंचाई संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत आणि ते कोणत्या स्थितीत आहेत, याचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश मनोज कायदे यांनी दिले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top