Grand free health camp: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष प्रा. सदाशिव मुंढे यांच्या पुढाकारातून मौजे जवळखेड (ता. देऊळगाव राजा) येथे रविवारी (२ ऑगस्ट) भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकारातून शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी; आ. मनोज कायंदे यांच्या हस्ते उद्घाटन
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष प्रा. सदाशिव मुंढे यांच्या पुढाकारातून मौजे जवळखेड (ता. देऊळगाव राजा) येथे रविवारी (२ ऑगस्ट) भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार मनोजभाऊ कायंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेरजी काझी होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. मनोजभाऊ कायंदे यांनी सांगितले की, स्व. अजितदादा पवार यांनी सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या कल्याणाला नेहमीच प्राधान्य दिले. समाजहितासाठी समर्पित त्यांची विकासाभिमुख कार्यशैली आजही प्रेरणादायी आहे.
यावेळी ॲड. नाझेरजी काझी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांद्वारे वंचित, शोषित व श्रमिक समाजाला न्याय, स्वाभिमान आणि संघर्षाची प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांचा वारसा आजही समाजाला दिशा देणारा आहे.
जालना हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप हुसे यांनी मनोगतात सांगितले की, समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारे असे मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे लोकसेवेचे उत्तम उदाहरण असून, अधिकाधिक नागरिकांनी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा.
सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते श्री. इरफान अली शेख, श्री. संतोष खांडेभराड, श्री. हाजी सिद्दीक शेठ, श्री. शाम जाधव, श्री. दिलीप झोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष श्री. शंतनु बोंद्रे, श्री. प्रकाश गिते, श्री. दिलीप सानप, श्री. छगनराव खरात, श्री. सुखदेव मुख्यदल, श्री. भगवानराव खरात, श्री. गणेशराव डोईफोडे, श्री. डी. टी. शिपने, जवळखेडच्या सरपंच सौ. शशिकलाताई गाटोळे, श्री. लक्ष्मण कव्हळे, श्री. जावळे मामा, श्री. सातपुते मामा, श्री. मारोतराव काकडे, श्री. डी. आर. चव्हाण सर, श्री. छबुराव चव्हाण, श्री. सिद्धार्थ जाधव, श्री. संतोष परिहार, श्री. सुनील शेजुळकर, श्री. प्रदीप वाघ, श्री. राजूशेठ खांडेभराड, श्री. गौरव गिते, श्री. सुखदेव शिरसाट, श्री. कैलास म्हस्के, श्री. राजुभाऊ अंभोरे, श्री. उमेश खरात, श्री. गजानन काकड, श्री. आशिष पोंधे, श्री. देवानंद गीते, श्री. दीपक चेके, श्री. नाजीम भाई, कु. शुभांगी पाखरे, श्री. बुद्धु चौधरी, श्री. विकास नागरे, भिवगावचे सरपंच श्री. घाडगे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, पदाधिकारी, ग्रामस्थ, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनंता गवई यांनी केले. प्रास्ताविक व आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा शिबिराचे आयोजक प्रा. सदाशिव मुंढे यांनी मानले.

