Mahabreaking

[breaking_news]

Horrific collision: देऊळगावजवळ टँकर-ट्रकची भीषण धडक; चालक ठार, एक जखमी

Horrific collision: पातूर-बाळापूर मार्गावरील देऊळगावजवळ सोमवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास टँकर व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

Horrific collision

  पातूर-बाळापूर मार्गावर भीषण अपघात; टँकर चालकाचा जागीच मृत्यू

निशांत गवई

पातूर : पातूर-बाळापूर मार्गावरील देऊळगावजवळ सोमवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास टँकर व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक (क्र. RJ 09 GG 9417) हा पातूरमार्गे जयपूरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी बाळापूरकडून येणारा टँकर (क्र. GJ 16 AV 7785) समोरून येत असताना दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात टँकर चालक जोगासिंग यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वानखेडे तसेच पोलीस कर्मचारी निखिल सूर्यवंशी, सचिन म्हात्रे, योगेश मूळवंडे, दत्तात्रय चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पत्रकार दुले खान युसूफ खान, मंगेश गाडगे तसेच देऊळगाव येथील धनंजय उपरवट यांनीही मदतकार्य केले.

जखमीला डॉ. फैजान व वाहनचालक सचिन बारोकर यांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top