Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Gram Panchayat By-elections :ग्रामपंचायत पोटनिवडणुका जाहीर; संग्रामपूर, चिखली, मेहकरमध्ये रंगणार लढत

Gram Panchayat By-elections :राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 59 ग्रामपंचायतींमधील रिक्त थेट सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये संग्रामपूर, चिखली व मेहकर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचा समावेश असून संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

Gram Panchayat By-elections
रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; 28 एप्रिलला मतदान

बुलढाणा : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 59 ग्रामपंचायतींमधील रिक्त थेट सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये संग्रामपूर, चिखली व मेहकर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचा समावेश असून संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. संग्रामपूर तालुक्यात मारोडा (प्रभाग क्र. 3 – अनुसूचित जमाती), धामणगाव (प्रभाग क्र. 2 – ना.मा.प्र. प्रवर्ग) तसेच वकाणा (प्रभाग क्र. 2 – ना.मा.प्र. महिला व सर्वसाधारण) या ठिकाणी एकूण चार सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे.
मेहकर तालुक्यात पारडा, पेनटाकळी, वाग्देव व दुर्गबोरी या चार ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी मतदान होणार आहे.
चिखली तालुक्यात थेट सरपंच पदासाठी कव्हळा (ना.मा.प्र.), कोनड (ना.मा.प्र./स्त्री) व किन्ही सवडत (अनुसूचित जमाती) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच सदस्य पदांसाठी किन्हीनाईक (प्रभाग क्र. 1 व 3 – अनुसूचित जमाती महिला) व बोरगाव वसु (अनुसूचित जाती) येथे निवडणूक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार अधिसूचना 30 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे 7 ते 13 एप्रिल दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारली जातील. 15 एप्रिल रोजी छाननी होणार असून 17 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल.
या पोटनिवडणुकांसाठी मतदान 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार असून, मतमोजणी 29 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
दरम्यान, निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तहसीलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top