Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Burglary in Balapur :बाळापूरमध्ये घरफोडी; ३.६२ लाखांचे दागिने लंपास

Burglary in Balapur :शहरातील शोएब कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ३ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Burglary in Balapur

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; शोएब कॉलनीत मोठी चोरी

ज़ाकिर अहमद

बाळापूर : शहरातील शोएब कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ३ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झा निसार बेग गुलजार बेग (वय ३५, व्यवसाय – धान्य व्यापारी, रा. शोएब कॉलनी, बाळापूर) हे २१ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ८.१० वाजता कुटुंबासह नातेवाईकांना भेटण्यासाठी जळगाव जामोद येथे गेले होते. घरातील कपाटात पत्नीचे सोन्या-चांदीचे दागिने ठेवून त्यांनी घराला कुलूप लावले होते.

दरम्यान, २२ मार्च रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता ते परत घरी आले असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात जाऊन पाहणी केली असता बेडरूमच्या दरवाजाचे तसेच कपाटाचे लॉक तोडलेले दिसून आले. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याचे नेकलेस, पोत, अंगठ्या, बाळी, लॉकेट-चेन तसेच चांदीचे दागिने असा एकूण ३,६२,५०० रुपयांचा माल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अनंत सुरवाडे यांनी फिर्याद नोंदवली असून, पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top