Mahabreaking

[breaking_news]

Ganja Transported :प्रवाशी ऑटोतून गांजाची वाहतुक, तिघांना अटक, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Ganja Transported : प्रवाशी ऑटोतून गांजाची वाहतुक करणाऱ्या तिघांना खदान पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून अंमली पदार्थ, वाहन, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ५ लाख २५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २९ मे रोजी करण्यात आली.

Ganja Transported

अकोल्यात गांजा तस्करीचा पर्दाफाश; खदान पोलिसांची दमदार कारवाई

अकोला : प्रवाशी ऑटोतून गांजाची वाहतुक करणाऱ्या तिघांना खदान पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून अंमली पदार्थ, वाहन, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ५ लाख २५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २९ मे रोजी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शीटाकळी मार्गावरून एका प्रवासी ऑटो रिक्षामधून अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिंधी कॅम्प परिसरात सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली.

दरम्यान, एमएच-३०-बीसी-४६४१ क्रमांकाच्या प्रवासी ऑटो रिक्षाची झडती घेतली असता वाहनात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. अधिक तपासणीदरम्यान वाहनातून ४ किलो ९४० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणात शेख शारीक शेख जाकीरोद्दीन, शेख तौफीक शेख रफीक आणि मोहम्मद इमरान खान कयुब खान (रा. डाबकी रोड, अकोला) यांना अटक करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी १ लाख २५ हजार रुपये किमतीचा गांजा, ३ लाख रुपये किमतीची प्रवासी ऑटो रिक्षा, सुमारे १ लाख रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन तसेच ३०० रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख २५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक दादा हरी वणवे तसेच खदान पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पुढील तपास खदान पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top