Mahabreaking

[breaking_news]

Funds Collected from Customers Embezzled :ग्राहकांकडून वसुल केलेली रक्कम केली हडप ; माजी बँक व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा

Funds Collected from Customers Embezzled :कर्जदारांकडून वसूल करण्यात आलेल्या हप्त्यांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवून तब्बल 1 लाख 98 हजार 850 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.   या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वित्तीय संस्थांच्या व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Funds Collected from Customers Embezzled

फायनान्स कंपनीला गंडा ; देऊळगाव राजात 1.98 लाखांच्या अपहाराचा आरोप

गजानन तिडके

देऊळगाव राजा : कर्जदारांकडून वसूल करण्यात आलेल्या हप्त्यांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवून तब्बल 1 लाख 98 हजार 850 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.   या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वित्तीय संस्थांच्या व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बळीराज खंडू भेरजे (वय 32, रा. उमरी, जि. नांदेड) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणातील आरोपींमध्ये धीरज संजय गवई (रा. शेलोडी, ता. चिखली, जि. बुलढाणा) आणि अमोल वसंतराव विभुते (रा. निवडुंगा, ता. जाफराबाद, जि. जालना) यांचा समावेश आहे.

तक्रारीनुसार, आरोपी धीरज गवई हा त्या काळात नम्रा फायनान्स लिमिटेडच्या देऊळगाव राजा शाखेत व्यवस्थापक म्हणून, तर अमोल विभुते हा फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत होता. त्यांनी कार्यकाळात तसेच कार्यकाळानंतर कंपनीच्या ग्राहकांकडून कर्जाचे हप्ते गोळा केले. मात्र ही रक्कम कंपनीच्या अधिकृत बँक खात्यात जमा करण्याऐवजी स्वतःच्या वैयक्तिक खात्यात जमा करून आर्थिक अपहार केल्याचा आरोप आहे.

सुमारे 1 लाख 98 हजार 850 रुपये कंपनीच्या खात्यात न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याने कंपनीची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी प्राथमिक अर्ज चौकशी करण्यात आल्यानंतर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला होता.त्यानंतर पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या लेखी आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यास परवानगी मिळाल्यानंतर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अपराध क्रमांक 247/2026 अंतर्गत कलम 316(4) बीएनएसनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा दि. 26 मे 2026 रोजी सायंकाळी 4.56 वाजता दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत असून, आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top