Mahabreaking

[breaking_news]

Attack on Power Theft Detection Squad :वीज चोरी पकडणाऱ्या पथकावर हल्ला; कर्मचाऱ्यांना काठीने मारहाण, सरकारी कामात अडथळा

Attack on Power Theft Detection Squad : वीज चोरीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची गंभीर घटना किनगाव जट्टू येथे मंगळवारी (दि. 26 मे) दुपारी घडली. मीटर तपासणीदरम्यान संतप्त झालेल्या एका वीज ग्राहकाने पथकातील कर्मचाऱ्यांवर काठीने हल्ला केल्याने दोन कर्मचारी जखमी झाले असून, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Attack on Power Theft Detection Squad

प्रधान तंत्रज्ञ जखमी, मोबाईलही हिसकावला ; किनगाव येथील घटना, गुन्हा दाखल

रमेश खंडागळे

बिबी : वीज चोरीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची गंभीर घटना किनगाव जट्टू येथे मंगळवारी (दि. 26 मे) दुपारी घडली. मीटर तपासणीदरम्यान संतप्त झालेल्या एका वीज ग्राहकाने पथकातील कर्मचाऱ्यांवर काठीने हल्ला केल्याने दोन कर्मचारी जखमी झाले असून, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून वीज चोरीविरोधात विशेष कारवाईसाठी आलेले पथक तसेच बिबी महावितरण कार्यालयातील कर्मचारी मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास किनगाव जट्टू येथे दाखल झाले होते. बाजार गल्ली परिसरात वीज चोरी संदर्भातील तपासणी सुरू असताना ग्राहक अनिल भगवान नागरे यांच्या घरातील मीटर व केबल जोडणीची तपासणी केली जात होती.

यावेळी पथकातील संजय खार्डे (प्रधान तंत्रज्ञ) व समाधान दिनकर पाटील (सहाय्यक अभियंता) हे मीटर कनेक्शनची पडताळणी करीत असताना अनिल नागरे अचानक हातात बांबूची काठी घेऊन तेथे आला. त्याने शिवीगाळ करत पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविल्याचा आरोप आहे. या मारहाणीत संजय खार्डे यांच्या कपाळावर काठीने मार लागल्याने गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला. तसेच त्यांच्या हात, पाठ व पायांवरही मारहाण करण्यात आली. तर सहाय्यक अभियंता समाधान पाटील यांच्या खांद्यावर व हातावर काठीने मार लागल्याचे सांगण्यात आले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत हस्तक्षेप करून दोघांची सुटका केली. दरम्यान, मारहाणीच्या वेळी आरोपीने खार्डे यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच “तुम्हाला काठीने जिवे मारून टाकतो, माझ्या घरातील मीटर तपासायला का आलात?  अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा व्हिडिओ पथकासोबत असलेल्या ओम दिलीप आंधळे यांनी मोबाईलमध्ये चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर पथकातील अधिकारी अक्षय वंजारी यांनी डायल 112 वर संपर्क साधून पोलीस मदत मागितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी कर्मचाऱ्यांना ग्रामीण रुग्णालय, बिबी येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी त्यांना रेफर करण्यात आले.या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविराज चव्हाण व पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top