Freeze Legislators Remuneration :देशातील आर्थिक परिस्थिती आणि शासकीय खर्च व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लागावा या उद्देशाने आजी व माजी लोकप्रतिनिधींचे मानधन एका वर्षासाठी स्थगित (गोठविण्याचा) करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

डोणगाव : देशातील आर्थिक परिस्थिती आणि शासकीय खर्च व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लागावा या उद्देशाने आजी व माजी लोकप्रतिनिधींचे मानधन एका वर्षासाठी स्थगित (गोठविण्याचा) करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात सावजी यांनी देशासमोरील आर्थिक आव्हानांचा उल्लेख करत, पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच सर्व आजी-माजी खासदार आणि आमदार यांच्या मानधनाबाबत एक वर्षासाठी स्थगितीचा विचार करण्यात यावा, अशी सूचना केली आहे.
विशेष म्हणजे, सावजी यांनी स्वतःपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्रातील माजी लोकप्रतिनिधी म्हणून माझेही मानधन त्याच कालावधीसाठी गोठवण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी पत्रात मांडल्याचे सांगितले जात आहे.लोकप्रतिनिधींनी कठीण काळात जनतेसमोर आदर्श निर्माण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत, अशा निर्णयामुळे शासकीय तिजोरीवरील खर्चात काही प्रमाणात बचत होऊन आर्थिक व्यवस्थापनास मदत मिळू शकते, असा विश्वास सावजी यांनी व्यक्त केला आहे.या विषयावर केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, सावजी यांच्या या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, यावर केंद्र सरकारची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

