Mahabreaking

[breaking_news]

Fatal Knife Attack :बोरगाव मंजूत युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला, तिघांविरुध्द गुन्हा दाखल

Fatal Knife Attack : गावातील एका युवकावर तिघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना 16 मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी तरुणावर अकोला येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Fatal Knife Attack

गंभीर जखमी युवकावर उपचार सुरू:हल्याचे कारण अस्पष्ट

बारेगाव मंजू : गावातील एका युवकावर तिघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना 16 मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी तरुणावर अकोला येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पंकज कैलास अघडते (वय २७,  बोरगाव मंजू) यांच्यावर शनिवारी (दि.१६) रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घराच्या आवारात चाकूने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत पंकज अघडते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटावर, छातीवर, पाठीवर व दोन्ही हातांवर भोसक्याच्या जखमा झाल्या आहेत.

या संदर्भात पंकज यांचा भाऊ सुरज अघडते (वय २५) यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, सुरज अघडते हे बाहेर गावी जात असताना रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन करून पंकज हे घराच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडले असून जोरजोरात ओरडत असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच सुरज अघडते प्रवास अर्धवट सोडून तातडीने बोरगाव मंजूकडे रवाना झाले. दरम्यान, मित्राकडून पंकज यांना उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी थेट रुग्णालय गाठले.

रुग्णालयात पोहोचल्यानंतर पंकज यांच्यावर उपचार सुरू असल्याचे दिसून आले. त्यांच्या पोटावरील गंभीर जखमेमुळे आतडे बाहेर आल्याचे तसेच शरीरावर अन्य ठिकाणीही भोसक्याच्या जखमा असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. उपचारादरम्यान पंकज यांनी श्याम ठाकरे, ओम वाघमारे आणि रितेश यादव (सर्व रा. बोरगाव मंजू) यांनी शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून श्याम ठाकरे, ओम वाघमारे आणि रितेश यादव यांच्याविरुद्ध जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर हल्ला केल्याप्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ सह पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे , करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top