Administrative Transfers : अकोला विभागातील सर्व आरोग्यसेवक व आरोग्य निरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या दिनांक १५ मे २०२६ रोजी समुपदेशन पद्धतीने पारदर्शक वातावरणात पार पडल्या. ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि समाधानकारक पद्धतीने राबविण्यात आल्याने कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

रिक्त पदांची प्रत्यक्ष माहिती देत बदली प्रक्रिया; पारदर्शक पद्धतीने झाली प्रक्रीया
अकोला : अकोला विभागातील सर्व आरोग्यसेवक व आरोग्य निरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या दिनांक १५ मे २०२६ रोजी समुपदेशन पद्धतीने पारदर्शक वातावरणात पार पडल्या. ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि समाधानकारक पद्धतीने राबविण्यात आल्याने कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
या बदली प्रक्रियेसाठी उपसंचालक डॉ. वाघचौरे, राज्यस्तरावरून आलेल्या डॉ. दीप्ती पाटील, डॉ. वारे तसेच श्रीमती खडसे यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय उपसंचालक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेत प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
बदली प्रक्रियेदरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना एकाच सभागृहात बसवून उपलब्ध रिक्त पदांची माहिती प्रत्यक्ष दाखविण्यात आली. त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यास आपल्या पसंतीनुसार पदस्थापना निवडण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार बदली व पदस्थापना मिळाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रक्रियेमध्ये सहाय्यक संचालक हिवताप डॉ. अन्सारी तसेच सर्व जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले. सर्व संबंधितांच्या संयुक्त प्रयत्नातून ही बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

