Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

sant Gadge Baba Jayanti :अंत्री (मलकापूर) येथे चार दशकांची परंपरा; संत गाडगे बाबांच्या जयंतीतून सामाजिक जागृतीचा संदेश

sant Gadge Baba Jayanti : तालुक्यातील अंत्री (मलकापूर) येथे गेल्या तब्बल ४० वर्षांपासून संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा अखंड सुरू आहे. ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधन या गाडगेबाबांच्या शिकवणीचा वारसा जपण्याचे कार्य स्थानिक रामभरोसे मित्र मंडळ सातत्याने करत आहे.

sant Gadge Baba Jayanti
रामभरोसे मित्र मंडळाचा स्वच्छता, व्यसनमुक्ती व प्रबोधनाचा उपक्रम सातत्याने सुरू

बाळापूर : तालुक्यातील अंत्री (मलकापूर) येथे गेल्या तब्बल ४० वर्षांपासून संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा अखंड सुरू आहे. ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधन या गाडगेबाबांच्या शिकवणीचा वारसा जपण्याचे कार्य स्थानिक रामभरोसे मित्र मंडळ सातत्याने करत आहे.

डोंगरगावातील गवंडी काम करणाऱ्या मजुराच्या मुलीची ITBP मध्ये निवड

जयंतीनिमित्त सकाळी प्रभातफेरी काढण्यात येते. यामध्ये गावातील प्रमुख रस्ते, चौक तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहीम राबवली जाते. त्यानंतर गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक कीर्तनाचे आयोजन केले जाते. कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छता, शिक्षण, सामाजिक एकात्मता आणि अंधश्रद्धाविरोधी विचारांचा प्रभावी संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचविला जातो.

या उपक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. “स्वच्छ गाव – सुंदर गाव” हा संदेश केवळ घोषणेत न राहता प्रत्यक्ष कृतीतून साकार करण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे, गावात परीट समाजबांधवांची संख्या अत्यल्प असतानाही सामाजिक जाणीवेतून सर्व समाजघटक एकत्र येऊन जयंती साजरी करतात, ही बाब उल्लेखनीय ठरते.

यावर्षीच्या कार्यक्रमाला उरळ येथील आझाद फाऊंडेशन चे अध्यक्ष ‘शेतकरी पुत्र’ गोपाल भाऊ पोहरे यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तसेच श्रीकृष्णजी साबळे, प्रभाकरजी देशमुख (साधुबुवा), सुधीरभाऊ वाघोळे, वसंत देशमुख, बबलू बुवा सुरे, अमृतजी इंगळे, रूपेश इंगळे, प्रकाश टाले, गजाननबापू देशमुख, वकील इंगळे, गजानन बोराखडे (दैनिक विदर्भ मतदार प्रतिनिधी) यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार दशकांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा गावात सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करत असून, गाडगेबाबांच्या विचारांचा दीप पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य रामभरोसे मित्र मंडळ करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top