Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात

Driving test will be completely digital :प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अकोला येथे अत्याधुनिक स्वयंचलित वाहन चाचणी परीक्षण केंद्र (Automated Driving Test Track) उभारण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. वाहन परवाना चाचणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

Driving test will be completely digital
ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल; वाहन परवाना चाचणी होणार पारदर्शक

आगाखान पठाण
अकोला: प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अकोला येथे अत्याधुनिक स्वयंचलित वाहन चाचणी परीक्षण केंद्र (Automated Driving Test Track) उभारण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. वाहन परवाना चाचणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

चान्नी बसस्थानकाजवळ मधमाश्यांचा हल्ला; १५० पेक्षा अधिक डंख, एक जण गंभीर  

केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत राज्यातील ३८ आरटीओ कार्यालयांमध्ये अशी स्वयंचलित चाचणी केंद्रे उभारली जाणार असून त्यात अकोल्याचाही समावेश आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून अकोला येथील काम नाशिक येथील अशोका बिल्डकॉन कंपनी करीत आहे.
या स्वयंचलित चाचणी केंद्रामध्ये संगणकीकृत सेन्सर प्रणाली, सीसीटीव्ही निरीक्षण, तसेच ट्रॅकवर स्वयंचलित मूल्यांकन यंत्रणा अशा आधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे. वाहन चालविण्याच्या चाचणीदरम्यान मानवी हस्तक्षेप अत्यल्प राहणार असून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे चाचणी प्रक्रियेत पारदर्शकता वाढून पात्र उमेदवारांनाच वाहन परवाना मिळणे सुनिश्चित होणार आहे.
याबाबत माहिती देताना प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे केंद्र लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कामाला गती देण्यात आली आहे. केंद्र सुरू झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातील नागरिकांना वाहन परवाना चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील.
या प्रकल्पामुळे वाहन परवाना चाचणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि विश्वासार्ह होणार असून वेळेची बचत व तांत्रिक अचूकता वाढणार आहे. तसेच रस्ता सुरक्षेला देखील मोठी चालना मिळणार आहे. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख तसेच मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके उपस्थित होते. कर्तव्यदक्ष आरटीओ रवींद्र भुयार यांच्या प्रयत्नांमुळे अकोला येथे ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top