Mahabreaking

🔴 BREAKING
District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक

Four accused  :गुंज मारहाण प्रकरणातील चार आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Four accused  : येथून जवळच असलेल्या मौजे गुंज येथे शिवजयंती मिरवणुकीत डिजेच्या आवाजावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन पाच जण जखमी झाले होते.  पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून १९ जनांना वर गुन्हे दाखल करुन १९ फेब्रुवारी रोजी एका आरोपीस अटक केली होती, तर आज ७ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश तुपकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी अर्ज दाखल केला असता तो फेटाळला आहे.

Four accused

 

 माजी सभापती सुरेश तुपकर यांचा जामीन अर्ज फेटाळला

साखरखेर्डा :  येथून जवळच असलेल्या मौजे गुंज येथे शिवजयंती मिरवणुकीत डिजेच्या आवाजावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन पाच जण जखमी झाले होते.  पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून १९ जनांना वर गुन्हे दाखल करुन १९ फेब्रुवारी रोजी एका आरोपीस अटक केली होती, तर आज ७ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश तुपकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी अर्ज दाखल केला असता तो फेटाळला आहे.

मेहकर पुणे बस चालकाची प्रकृती बिघडली, पाच तासानंतर मिळाला नविन चालक

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मिरवणुकीत दोन गटात हाणामारी झाली होती . परस्पर तक्रारीवरून दोन्ही गटातील १९ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका आरोपीस अटक केल्यानंतर इतर आरोपी पसार झाले होते  . तपासादरम्यान शाम सुरेश तुपकर , पवन परसराम तायडे आणि अक्षय रामकिशन तुपकर या तिघांना २० मार्च रोजी अटक करण्यात आली. सुरुवातीला न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर २१ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .

दरम्यान या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध साखरखेर्डा पोलीस घेत असतांनाच दि. १ एप्रिल रोजी अमोल सुरेश तुपकर ,  गजानन केशव तुपकर ,  ऋतिक गजानन तूपकर , कडूबा मनोहर तुपकर या चार आरोपीना अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. या चारही जणांना २ एप्रिल रोजी कोर्टात हजर केले असता त्यांची बुलढाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर आज सुरेश माधवराव तुपकर यांनी मेहकर येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. साहाय्यक सरकारी वकील विनोद नरवाडे पाटील यांनी यशस्वी युक्तिवाद करताना जामीन का मिळू नये म्हणून बाजू मांडली . न्यायालयाने आज ७ एप्रिल रोजी त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top