Mahabreaking

[breaking_news]

Food and Drug Administration :बोरगाव मंजूत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; दूध डेअरीचे नमुने प्रयोगशाळेत

Food and Drug Administration : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांविरोधात धडक कारवाई मोहीम तीव्र केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाचे पथक बोरगाव मंजू येथे दाखल झाले.

Food and Drug Administration

भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम

बोरगाव मंजू : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांविरोधात धडक कारवाई मोहीम तीव्र केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाचे पथक बोरगाव मंजू येथे दाखल झाले.

महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने दे. गो. वीर, सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर बोरचाटे (अन्न सुरक्षा अधिकारी), जयकांत नमुना सहाय्यक आणि त्र्यंबक मोहोड यांच्या पथकाने बोरगाव मंजू येथे तपासणी मोहीम राबविली.

तपासणीदरम्यान दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एका डेअरीची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या दूध व दह्याचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

तसेच संबंधित आस्थापनेकडे आवश्यक अन्न परवाना अथवा नोंदणी नसल्याचे निदर्शनास आल्याने त्या आस्थापनेला विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले. नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या तपासण्या नियमितपणे सुरू राहणार आहेत. अन्न व्यवसायिकांनी कायद्याच्या तरतुदींचे काटेकोर पालन करावे, तसेच आवश्यक परवाने व नोंदणी पूर्ण ठेवाव्यात, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top