Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Girish Gokhale :अकोला मनपातील यशानंतर गिरीश गोखले यांचा खरप बु. येथे भव्य सत्कार

Girish Gokhale :अअकोला महानगरपालिकेवर स्विकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर अॅड. गिरीश गोखले यांचा खरप बु. येथे भव्य आणि उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. नालंदा बुद्ध विहार समिती आणि विशाखा महिला संघ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत ‘गोखले भाऊ’ंच्या निवडीचा आनंद साजरा केला.

Girish Gokhale

अकोला : अकोला महानगरपालिकेवर स्विकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर अॅड. गिरीश गोखले यांचा खरप बु. येथे भव्य आणि उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. नालंदा बुद्ध विहार समिती आणि विशाखा महिला संघ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत ‘गोखले भाऊ’ंच्या निवडीचा आनंद साजरा केला.

या सत्कार सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. गोखले यांच्या निवडीमुळे स्थानिक पातळीवर नेतृत्वाला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. “सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व आता मनपात पोहोचले आहे,” अशी प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटली.

कार्यक्रमात दिलीप शिरसाठ, संदेश वाकोडे, सचिन गोरले पाटील, देवानंद इंगळे, पंजाब शिरसाठ, महादेव इंगळे, अशोक इंगळे, चंद्रशेखर इंगळे, सुनील तायडे, नितीन भटकर, संजय इंगळे, पांडुरंग इंगळे, वैभव शिरसाठ, विलास इंगळे, विलास बनसोड, रोशन इंगळे यांसह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सेवानंद इंगळे यांनी केले. या सत्कारातून स्थानिक पातळीवर गोखले यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाची झलक पाहायला मिळाली. आगामी काळात अकोला महानगरपालिकेतून विकासकामांना गती देत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. या निवडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top