Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Battered by Hailstorm :गारपिटीचा तडाखा; काढणीवरील पिके जमीनदोस्त – लोणार तालुक्यात शेतकरी उद्ध्वस्त!

Battered by Hailstorm :कारेगावसह लोणार तालुक्यात अवकाळी पावसासोबत झालेल्या भीषण गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर आलेली पिके काही क्षणांत जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. हरभरा, गहू, मका आणि चिया यांसारख्या प्रमुख रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिके आडवी पडून सडण्याच्या स्थितीत आहेत.

Battered by Hailstorm

भागवत चव्हाण
कारेगाव : कारेगावसह लोणार तालुक्यात अवकाळी पावसासोबत झालेल्या भीषण गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर आलेली पिके काही क्षणांत जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. हरभरा, गहू, मका आणि चिया यांसारख्या प्रमुख रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिके आडवी पडून सडण्याच्या स्थितीत आहेत.
या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. आधीच वाढती उत्पादनखर्च, अनियमित बाजारभाव आणि कर्जबाजारीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता निसर्गानेच घाव घातल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
दरम्यान, कारेगाव परिसरात भेंडी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडणीसाठी तयार असलेले पीक गारपिटीच्या तडाख्यात सापडले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे कोसळली, तर भेंडीची झाडे जमिनीवर आडवी पडून उत्पादन पूर्णतः ठप्प झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.

Battered by Hailstorm
या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी तीव्र मागणी होत आहे. मदतीशिवाय शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकला असून, शासनाने केवळ आश्वासन न देता त्वरित निर्णय घ्यावा, असा संतप्त सूर शेतकरी व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top