Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Woman molested in Rohana :रोहणा येथे महिलेचा विनयभंग; पतीवर लोखंडी गजाने हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Woman molested in Rohana : तालुक्यातील रोहणा गावात एका महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीवर लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दिनांक 2 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास ग्राम रोहणा येथे घडली.

Woman molested in Rohana

देऊळगाव राजा: तालुक्यातील रोहणा गावात एका महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीवर लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दिनांक 2 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास ग्राम रोहणा येथे घडली.
तक्रारीनुसार, फिर्यादी आपल्या घरासमोर उभ्या असताना आरोपी अमोल दत्तु खरात याने विनयभंग केला. या प्रकारानंतर फिर्यादी व साक्षीदार आरोपींना समज देण्यासाठी गेले असता, आरोपी दत्तु उत्तम खरात, द्वारका दत्तु खरात व आश्विनी अमोल खरात यांनी फिर्यादीच्या पती व मुलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, आरोपी अमोल खरात याने लोखंडी गज घेऊन फिर्यादीच्या पतीच्या डोक्यावर, कपाळाच्या वरच्या भागावर वार करून त्यांना जखमी केले. जखमी पतीवर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार 3 मार्च 2026 रोजी रात्री 9.37 वाजता दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत. घटनेमुळे रोहणा परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top