Mahabreaking

[breaking_news]

Eye Check-up Camp  :महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त नेत्र तपासणी शिबिर उत्साहात  

Eye Check-up Camp  :बिबी येथील येथील भिमाई महिला बहुउद्देशीय संस्था आणि लॉयन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजी नगर ( चिकलठाणा )यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Eye Check-up Camp

बीबी:  बिबी येथील येथील भिमाई महिला बहुउद्देशीय संस्था आणि लॉयन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजी नगर ( चिकलठाणा )यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील  त्यांचे हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले असून अद्विका महाविद्यालयाच्या संचालिका पुष्पाताई बनकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्रमुख पाहुणे बोरकर (केंद्र प्रमुख ), डहाळके ( मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा बिबी) सिताराम इंगळे, सुर्यभान हिवाळे, अण्णाभाऊ इंगळे,पारस इंगळे,लहू हिवाळे,प्रभाकर इंगळे, विणा ताई डांगे ( अंगणवाडी सेविका ),अनिताताई इंगळे ( महसूल कर्मचारी ), रेखा ताई वाघ ( अंगणवाडी सेविका ) आदी उपस्थित होते. यावेळी भिमाई महिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वनिताबाई इंगळे, उपाध्यक्ष रेशमाबाई हिवाळे, सचिव नंदाबाई इंगळे, सदस्य पार्वतीबाई हिवाळे, वंदना वाकोडे, लक्ष्मी बाई गवई, आशा बाई हिवाळे, इंदूबाई वाकळे, चंद्रभागा बाई साळवे, शिंधू बाई हिवाळे, रामकोर बाई इंगळे, यमूना बाई इंगळे, शालू बाई चव्हान, शोभा बाई इंगळे, संगिता बाई इंगळे,सुशीला बाई इंगळे आदी उपस्थित होते.

रुग्ण तपासणीसाठी लायन्स क्लब ऑफ संभाजीनगर (चिकलठाणा ) यांचे नेत्र रुग्ण तपासणी डॉ.सूमित गवळी , डॉ. मंथन बदर, शुभम दाभाडे, नितेश देवरे, अविनाश सोनुने यांनी रुग्णसेवा दिली.  यावेळी बिबी गावासह पंचक्रोशीतील तिनशेहून अधिक नेत्र रुग्णांनी या रुग्णसेवेचा लाभ घेतला असून काही रुग्णांना माफक दरामध्ये चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तर काही रुग्णांची ऑपरेशन साठी निवड करण्यात आली असून लायन्स क्लब ऑफ संभाजीनगर चिखलठाणा यांच्याकडून ऑपरेशनची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.  भिमाई महिला बहुउद्देशीय संस्था बिबी यांचे कडून समाज उपयोगी उपक्रम सतत होत असून याचा लाभ पंचक्रोशीतील जनतेला होत आहे. असेच उपक्रम यापुढेही सुरूच राहतील असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.   कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार ब्रम्हानंद वाकोडे यांनी सर्व डॉक्टर टीमचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top