Mahabreaking

[breaking_news]

Woman Attacked :देऊळगाव राजा शहरात महिलेवर चाकूहल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Woman Attacked : शहरातील संजय नगर परिसरात घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Woman Attacked :

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : शहरातील संजय नगर परिसरात घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवीनबी इकबाल खान (वय ३६, रा. संजय नगर, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी म्हणून मेधा सतीश घाटे, तन्मय प्रकाश घाटे आणि राहुल ओमकार घाटे (तिघेही रा. साईनगर, देऊळगाव राजा) यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. ही घटना १२ एप्रिल २०२६ रोजी   घडली. तक्रारदार महिला घरी असताना आरोपी थेट त्यांच्या घरात घुसले. त्यांनी “इकबाल खान कुठे गेले?” अशी विचारणा केली. त्यावर संबंधित व्यक्ती घरी नसल्याचे महिलेने सांगितल्याचा पोलिसांत नमूद आहे.

याच कारणावरून वाद वाढला आणि आरोपींपैकी तन्मय घाटे याने महिलेच्या उजव्या पायाच्या मांडीवर चाकूने वार करून जखमी केले, तर उर्वरित दोघांनी चापट-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे तक्रारदार महिलेने स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुदध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top