Mahabreaking

[breaking_news]

MIDC Police take action :चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटणारा आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

MIDC Police take action :वाहनातून सोडण्याच्या बहाण्याने एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटणाऱ्या आरोपीला औद्योगिक वसाहत पोलिसांनी गजाआड केले आहे.  त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर पोलिसांनी प्रभावी अंकुश आणल्याचे दिसून येत आहे.

MIDC Police take action

टी-पॉईंटवर वाहनातून सोडण्याच्या बहाण्याने लूट; २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

संजय तायडे

अकोला : वाहनातून सोडण्याच्या बहाण्याने एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटणाऱ्या आरोपीला औद्योगिक वसाहत पोलिसांनी गजाआड केले आहे.  त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर पोलिसांनी प्रभावी अंकुश आणल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणातील फिर्यादी विक्रमकुमार सुरेश दुबे (वय ३१, रा. बिसनपुर होरील, टपाल कमलापुर बिथरोल, जि. मुझफरपूर, बिहार) यांनी औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, ८ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास ते येवता टी-पॉईंट येथे उभे असताना काळ्या रंगाची व लाल पट्टे असलेली टीव्हीएस अपाची दुचाकीवर आलेल्या एका अनोळखी तरुणाने त्यांना “लेबन कंपनीकडे सोडतो” असे सांगून गाडीवर बसविले.

काही अंतरावर गेल्यानंतर आरोपीने फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील रेडमी ८ ए कंपनीचा आकाशी निळ्या रंगाचा अँड्रॉइड भ्रमणध्वनी जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपी दुसऱ्या एका काळ्या शर्टातील दुचाकी चालकासोबत घटनास्थळावरून पसार झाला. या तक्रारीवरून औद्योगिक वसाहत पोलिसांनी गुन्हा क्रमांक २९५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपी मंगेश उत्तमराव वावगे (वय २१, रा. महात्मा फुले नगर, नवसारी अमरावती, सध्या रा. कैलास नगर, कुंभारी, अकोला) याला अटक केली. या गुन्ह्यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक आरोपीकडून फिर्यादीचा १३ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी, ५०० रुपये किमतीचा लोखंडी चाकू आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीची टीव्हीएस अपाची दुचाकी असा एकूण २ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलिस अधीक्षक ईशानी आनंद आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. या मोहिमेत पोलिस मुख्य शिपाई विजय अंभोरे आणि पोलिस शिपाई भूषण सोळंके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस मुख्य शिपाई विजय अंभोरे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top