Independence Day celebrated : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न श्री समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे समर्थ शैक्षणिक संकुलात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव सतीश कायंदे यांच्या उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शिक्षणातून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या; नंदाताई कायंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
गजानन तिडके
देऊळगाव राजा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न श्री समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे समर्थ शैक्षणिक संकुलात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव सतीश कायंदे यांच्या उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्रीमती नंदाताई कायंदे यांनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झालेल्या संघर्षाची माहिती दिली. स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करून तरुणांनी देशाच्या सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे. शिक्षणाच्या माध्यमातून एकजूट, एकता आणि राष्ट्रविकासाची भावना जोपासत देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मोहजितसिंग राजपूत यांनी केले. यावेळी श्री समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, उपप्राचार्य देवानंद नागरे, समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे, समर्थ स्कूल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य डॉ. योगेश ताठे, समर्थ ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन घुगे, तसेच प्रा. गबाजी कुटे, भानुदास कोल्हे, वसंतराव नागरे, महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री समर्थ कृषी महाविद्यालय व समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

