Guardian Minister Makarand Patil : कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सेवा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण; पोलीस विभागाला २७ नव्या वाहनांचा ताफा
बुलढाणा : कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सेवा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्राच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आणि कामगार दिनाच्या औचित्याने पोलिस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह विविध मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त अकोला विद्युत भवनात लाईनमन पुतळ्याचे अनावरण
पालकमंत्री पाटील यांनी कृषी क्षेत्रातील उपाययोजनांवर विशेष भर देत सांगितले की, अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी १६ हजार कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला असून बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी रुपयांची मदत थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. यासोबतच “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” व नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्यात १.१६ लाखांहून अधिक उद्यम नोंदणी होऊन २.४८ लाखांपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. निर्यातीतही जिल्ह्याने आघाडी घेतली असून जानेवारी २०२६ अखेर ८६८ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती झाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ७२९ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून १८ गावांना टँकरद्वारे तर ५९ गावांना विहीर अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरण संवर्धनासाठी ३०० कोटी वृक्ष लागवड, तसेच “प्रधानमंत्री आवास योजना” अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुल मंजुरी व पूर्णत्वास जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिला सक्षमीकरणासाठी “उमेद” अभियानांतर्गत २४ हजार स्वयं-साहाय्य गट स्थापन करण्यात आले असून २ लाखांहून अधिक कुटुंबांना जोडण्यात आले आहे. “लखपती दीदी” संकल्पनेतून महिलांना आर्थिक बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य, शिक्षण आणि डिजिटल सेवांमध्येही जिल्हा पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस दलाने शानदार पथसंचलन सादर केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

पोलीस विभागाला २७ नव्या वाहनांचा ताफा
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस विभागाला २७ नव्या वाहनांचे वितरण पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये महिला सुरक्षेसाठी कार्यरत ‘दामिनी’ पथकांच्या ७ वाहनांचाही समावेश आहे. या वाहनांमुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढून आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे सुलभ होणार आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

