Amar Gawarguru :महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने महावितरणच्या अकोला परिमंडळात आयोजित विशेष कार्यक्रमात खामगाव विभागातील अमर गवारगुरू यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खामगाव विभागातील कर्मचाऱ्याचा अकोला येथे मुख्य अभियंत्यांच्या हस्ते गौरव
खामगाव : महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने महावितरणच्या अकोला परिमंडळात आयोजित विशेष कार्यक्रमात खामगाव विभागातील अमर गवारगुरू यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अकोला येथे झालेल्या या सोहळ्यात महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते गवारगुरू यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. खामगाव विभागात कार्यरत असताना त्यांनी तांत्रिक कामात प्राविण्य दाखवत ग्राहकांना तत्पर सेवा दिल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास महावितरणचे अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते तसेच अकोला व खामगाव परिमंडळातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करत, “उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा,” असे आवाहन केले.

