Mahabreaking

[breaking_news]

District Collector :खामगाव नगरपालिकेत जिल्हाधिकाऱ्यांची अचानक एन्ट्री; कामकाजाची घेतली कसून झडती

District Collector :जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मंगळवारी खामगाव नगरपालिकेला अचानक भेट देत कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. या अनपेक्षित भेटीमुळे पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आणि अधिकारी-कर्मचारी तत्काळ सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

District Collector

खामगाव : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मंगळवारी खामगाव नगरपालिकेला अचानक भेट देत कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. या अनपेक्षित भेटीमुळे पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आणि अधिकारी-कर्मचारी तत्काळ सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शेगाव दौऱ्यावर असताना वेळ काढत त्यांनी खामगाव येथे धडक दिली. यावेळी निर्माणाधीन स्व. भाऊसाहेब फुंडकर सांस्कृतिक सभागृहाच्या कामाचा सविस्तर आढावा घेत त्यांनी कामाची गुणवत्ता आणि गती याबाबत सूचना केल्या. तसेच नटराज बागेतील सुरू असलेल्या विस्तारीकरणाच्या कामांची पाहणी करत त्यांनी समाधान व्यक्त केले, मात्र कामाची सातत्यपूर्ण गती राखण्याचे निर्देश दिले.
यानंतर त्यांनी नगरपालिकेतील विविध विभागांना भेट देत कामकाजाची माहिती घेतली. विशेषतः जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील प्रक्रियेचा बारकाईने आढावा घेत नागरिकांना वेळेत आणि सुरळीत सेवा मिळावी, यासाठी अधिक दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या पाहणीदरम्यान मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आकस्मिक भेटीमुळे पालिका प्रशासन अधिक सतर्क आणि जबाबदार बनल्याचे स्पष्टपणे जाणवले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top