Mahabreaking

[breaking_news]

Public Awareness :बाळापूर ग्रामीण शासकीय रुग्णालयाचा जनजागृती संदेश!

Public Awareness :ग्रामीण शासकीय रुग्णालयाच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम म्हणून मोफत एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही लस आता दररोज रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Public Awareness

मोफत एचपीव्ही लसीकरण मोहीम – मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल

ज़ाकिर अहमद

बाळापूर : ग्रामीण शासकीय रुग्णालयाच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम म्हणून मोफत एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही लस आता दररोज रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे लसीकरण विशेषतः १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी अत्यंत आवश्यक व लाभदायक मानले जाते. एचपीव्ही लस गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी ठरते. हा कर्करोग महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आजार आहे.

रुग्णालय प्रशासनाने माहिती देताना सांगितले की, ही लस पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी असून शासनमान्य आहे. योग्य वेळी लसीकरण केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर आरोग्य धोक्यांपासून बचाव होऊ शकतो.

ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या मुलींना घेऊन जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात येऊन या सुविधेचा लाभ घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top